संगीतकार प्रा.संदीप भुरे यांचे
दिवाळी आली गीत ५ नोव्हेंबर ला रिलीज होणार
महाराष्ट्रातील ‘चांद मातला…’
व ‘याच वाटेवरी मोगरा…’
फेम तथा मधुर स्वराच्या
सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायिका,
वैशाली सामंत,मुंबई यांनी स्वर दिलेल्या व प्रा.संदीप भुरे,नांदेड यांनी संगीतबद्ध केलेल्या खास दिवळी पर्वानिमित्त टी-सिरीज कंपनीचे ‘दिवाळी आली’ हे गीत येत्या ५ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.
म्युजिक प्रोग्रामिंग अरेजमेंट व मिक्स मास्टर चंद्रजित कांबळे यांनी केले आहे.दिग्दर्शक तथा कोरिओग्राफर म्हणून रवी धस यांनी बाजू सांभाळली आहे.या गीताचे गीतकार प्रसिद्ध व्यक्तिमत्व शशांक कोंडविलकर हे आहेत. यात अभिनेते पवन गावंड,मुकूल फाटे,हर्षद अहिरे,संचिता डावळे,श्रेव्यानी काशिद,कृतिका सातार्डेकर, शबरी देशमुख,आनंद विशे, प्रतिक कानडे,प्रसाद बोमले व तंत्रज्ञ म्हणून कुणाल महाजन, पवन वाघ,अनिकेत धुरी आदि संगीत,अभिनय,तंत्रज्ञ कलाकारांचा विशेष सहभाग आहे.
प्रकाश पर्वात रोषणाईच्या दिव्य कौटुंबिक उत्तुंग क्षणांत तल्लीन होत या सदरील गीताचा श्रवणीय आनंद महाराष्ट्रातील तमाम चाहत्या संगीत रसिकांनी आवर्जून घ्यायचा आहे,असे आवाहन वैशाली सामंत, संगीतकार प्रा.संदीप भुरे यांनी केले आहे.











