किशोर माध्यमिक विद्यालयात सावित्रीच्या लेकींना मानव विकास योजना अंतर्गत सायकलचे वाटप
किशोर माध्यमिक विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहा विद्यार्थिनींना शाळेचे प्राचार्य राजेश्वर आटकळे व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील मुली ह्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेपासून ३ ते ४ किलोमीटर अंतर असलेल्या व त्या ठिकाणी मानव विकास योजनेअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाची लाल परी बस जात नाही. अशा ठिकाणी वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनी साठी शासनाने मुलींना शाळेसाठी ये-जा करण्यासाठी सायकल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अटकळी येथील किशोर माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या खेड्यापाड्यातील मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक विजयकुमार कचवे, बालचंद गायकवाड, संभाजी पाटील गव्हाणे, राजेंद्रकुमार बैस, चंद्रकांत कनशेटे, सौ. रंजना मुर्गे मॅडम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











