
जलजीवन मिशनवर कोट्यवधींचा खर्च, तरीही गावागावांत पाण्याची प्रतीक्षा; अपूर्ण कामांवर लोकप्रतिनिधींची नाराजी, संभाव्य टंचाई रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
बिलोली प्रतिनिधी : विनोद वाघमारे
बिलोली : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने बिलोली तालुक्यात आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांची धावपळ उडण्याची आणि गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सतर्क राहून ठोस उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी दिले.
शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आमदार अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली पंचायत समितीच्या सभागृहात संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली.
विशेष म्हणजे, जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक गावांमध्ये नळजोडणीची कामे अद्याप अर्धवट असल्याची बाब बैठकीत समोर आली. शासनाचा निधी खर्च होतो, योजना राबवल्या जातात; मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नसेल, तर या योजनांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित झाला. अनेक गावांतील अपूर्ण कामांमुळे नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची नाराजी आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांनी व्यक्त केली.
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची धावपळ करण्यापेक्षा संकट येण्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि यंत्रणांनी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. केवळ कागदोपत्री प्रगती दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक गावाची पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन करावे, अशा सूचना आमदार अंतापूरकर यांनी दिल्या.
कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पाण्याचा प्रश्न कायम राहणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता, विद्युत विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्यासह विविध गावांचे आजी-माजी सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल लागलेली असताना प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामातून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईचे संकट ओढवण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे! आमदार अंतापूरकरांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा
जलजीवन मिशनवर कोट्यवधींचा खर्च, तरीही गावागावांत पाण्याची प्रतीक्षा; अपूर्ण कामांवर लोकप्रतिनिधींची नाराजी, संभाव्य टंचाई रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
बिलोली प्रतिनिधी : विनोद वाघमारे
बिलोली : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने बिलोली तालुक्यात आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांची धावपळ उडण्याची आणि गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच सतर्क राहून ठोस उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी दिले.शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी आमदार अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली पंचायत समितीच्या सभागृहात संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे, जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक गावांमध्ये नळजोडणीची कामे अद्याप अर्धवट असल्याची बाब बैठकीत समोर आली. शासनाचा निधी खर्च होतो, योजना राबवल्या जातात; मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नसेल, तर या योजनांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित झाला. अनेक गावांतील अपूर्ण कामांमुळे नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची नाराजी आजी-माजी सरपंच व ग्रामसेवकांनी व्यक्त केली.पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची धावपळ करण्यापेक्षा संकट येण्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि यंत्रणांनी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. केवळ कागदोपत्री प्रगती दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक गावाची पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन करावे, अशा सूचना आमदार अंतापूरकर यांनी दिल्या.कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पाण्याचा प्रश्न कायम राहणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.या बैठकीस तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता, विद्युत विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्यासह विविध गावांचे आजी-माजी सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल लागलेली असताना प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामातून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त होत आहे.











