अटकळी किशोर विद्यालयात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन
बिलोली विलास शेरे
अटकळी किशोर विद्यालयात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन
बिलोली विलास शेरे
बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निम्मित त्यांच्या प्रतिमेचे प्राचार्य राजेश्वर आटकळे यांचे हस्ते पूजन करुन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य राजेश्वर आटकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत. गरिबीमुळे माणसाचे कर्तृत्व ठरत नसते, तर जिद्द, चिकाटी आणि अविरत परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते,” असे प्रतिपादन केले.तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या प्रांगणात एक तास सामूहिक वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. वाचनातून मिळालेल्या ज्ञानाचे आणि अनुभवांचे कथन अंबिका कुंभार, सौंदर्या मेहत्री, सरस्वती पोलकमवाड, ऋतुजा कांबळे, वैष्णवी भिंगे, भाग्यश्री महागावे आदी विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर विद्यालयात पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले.
यावेळी सहशिक्षक विजयकुमार कचवे, संभाजी पाटील गव्हाणे, बालचंद गायकवाड, राजेंद्रकुमार बैस, चंद्रकांत कनशेटे, रंजना मुरगे, मेघाबाई उप्पलवार, ज्ञानेश्वर बिजलीकर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











